मुंबई : समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि हवामानात झालेले बदल या कारणांमुळे गुरुवारी रात्री मुंबईत हलक्याशा सरींचा शिडकावा झाला. गेल्या चोवीस तासात शहर - उपनगरात हवामान कोरडे होते, त्यामुळे मुंबईकरांना कमाल तापमानाला सामोरे जावे लागत आहे.
ऐन थंडीच्या मोसमात मुंबईकरांना नोव्हेंबर महिन्याचा दुसरा आठवडा उजाडला तरी, उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. त्यात किमान तापमान खाली घसरण्याची शक्यता असूनही अद्याप ते 25 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात आले आहे. प्रत्यक्षात नोव्हेंबर मध्यार्पयत 18 ते 2क् अंश नोंदविण्यात येते.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम-मध्य बंगालचा उपसागर व लगतच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता मन्नारचे आखात आणि दक्षिण तामिळनाडूचा किनारा, श्रीलंकेलगतच्या भागावर आहे. शिवाय दक्षिण गुजरातच्या किना:यार्पयत असणारा कमी दाबाचा पट्टा आता लक्षद्विपपासून गुजरातच्या किना:यार्पयत आहे.
गेल्या चोविस तासांत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे होते. मध्य-महाराष्ट्र व मराठवाडयाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण-गोवा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.
पुढील चोवीस तासांत कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाडयात काही ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणो आणि आसपासच्या परिसरात मेघगजर्नेसह काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. येथील कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 28, 2क् अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. (प्रतिनिधी)
भिवंडीत बरसला पाऊस
1भिवंडी शहर व तालुक्यात गुरूवारी सायंकाळी 6-15वाजताच्या सुमारास अचानक पाऊस आल्याने शहरात सर्वाची तारांबळ उडाली. संध्याकाळच्या वेळी घरी जाण्यासाठी सर्वाचीच लगबग सुरू असताना भर पावसानेच त्यांना थांबवले.
2सातत्याने एक तास सुरू राहिलेल्या या पावसामुळे सर्वाना नियोजीत ठिकाणी जाण्यास वेळ झाला. वीजेच्या कडकडाटात अचानक आलेल्या या पावसाने सर्वानाच चकवा दिला. अनेकांना रस्त्यावरच आडोसा बघून थांबणो भाग पडले.
3ग्रामीण भागात तर शेतक:यांच्या भाताचे भारे भिजून त्यांचे नुकसान झाले. जवळपास तासाभरानंतर पाऊस थाबला आणि सर्व व्यवहार पुन्हा पूर्ववत झाले. शहरात कोठेही अनुचित घटना घडली नाही.