Join us  

आयटीआयच्या जागा घटल्या; प्रवेशाला सोमवारपासून सुरुवात!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2019 3:04 AM

यंदा सरकारी आणि खासगी विभाग मिळून १,३७,३०० जागा उपलब्ध

मुंबई : राज्यातील सरकारी आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला सोमवार, ३ जूनपासून सुरुवात होणार आहे. दोन्ही विभागांत मिळून एकूण १ लाख ३७ हजार ३०० जागा उपलब्ध असून, त्यासाठी ३० जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली.

यंदा राज्यात खासगी आणि शासकीय विभागांत तब्बल २ हजार १९२ जागा घटल्या आहेत. या वर्षीपासून एनएसक्यूएफप्रमाणे आयटीआय संस्थांमधील अभ्यासक्रम आणि जागांच्या संख्येची संरचना करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एनएसक्यूएफच्या दर्जाप्रमाणे प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यांना देण्यात येणारे प्रमाणपत्र हे आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील पात्र ठरणार असल्याची माहिती आयटीआयचे उपसंचालक योगेश पाटील यांनी दिली. त्यामुळे जागांच्या संख्येत घट झाली असली, तरी कौशल्याचा दर्जा वाढणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुंबई विभागात खासगी आणि शासकीय मिळून एकूण १६,१७३ जागा उपलब्ध आहेत. यामध्ये खासगी आयटीआयमध्ये ३,७७२ तर शासकीय आयटीआयमध्ये १६,०६० जागा उपलब्ध आहेत. २०१८ मध्ये मुंबईत उपलब्ध जागांची संख्या १९ हजार ७०७ इतकी होती.

प्रवेशाचे वेळापत्रक :ऑनलाइन अर्ज करणे : ३ ते ३० जूनप्रवेश अर्ज निश्चित करणे : ६ जून ते १ जुलै (सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत)प्राथमिक गुणवत्ता यादी : ४ जुलै २०१९ (सकाळी ११ वाजता)गुणवत्ता यादीवर हरकती नोंदविणे : ४ जुलै ते ५ जुलै (सकाळी ११ ते सायं. ५)अंतिम गुणवत्ता यादी : ९ जुलै २०१९ (सायंकाळी ५ वाजता)पहिली प्रवेश फेरी : १० जुलै २०१९ (सायंकाळी ५ वाजता)दुसरी प्रवेश फेरी : १२ जुलै ते १६ जुलै(सकाळी ९ वाजल्यापासून ते सायंकाळी ५ पर्यंत)तिसरी प्रवेश फेरी : २१ जुलै ते २५ जुलै(सकाळी ९ पासून ते सायंकाळी ५ पर्यंत)चौथी प्रवेश फेरी : ३१ जुलै ते ३ ऑगस्ट(सकाळी ९ पासून ते सायंकाळी ५ पर्यंत)

टॅग्स :आयटीआय कॉलेज