Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘इतिहास गवाह है’ने रचला इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 01:15 IST

महाकवी कालिदास नाट्यगृह, मुलुंड : पुण्यातील बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे ते विद्यार्थी. वय अवघे १७ ते २० वर्षांचे. असहिष्णुता, धार्मिकता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अशा विषयांबाबतची परिपक्वता या वयातील तरुणांमध्ये फारशी दिसत नाही, असा एक समज आहे.

महाकवी कालिदास नाट्यगृह, मुलुंड : पुण्यातील बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे ते विद्यार्थी. वय अवघे १७ ते २० वर्षांचे. असहिष्णुता, धार्मिकता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अशा विषयांबाबतची परिपक्वता या वयातील तरुणांमध्ये फारशी दिसत नाही, असा एक समज आहे. मात्र तरुणाईने सादर केलेला विषय नाट्यसंमेलनात लक्ष वेधून घेतो...तो विषय असतो लेखकांच्या अभिव्यक्तीच्या गळचेपीचा. कुठल्याही एका पक्षाच्या बाजूने ना कोणताही झुकाव, ना कुणावर टीकेची झोड. एका तटस्थ भूमिकेतून जे वाटले तेच मांडले या आविर्भावात नाटकांची मांडणी करणाऱ्या अशा ‘इतिहास गवाह है’ या एकांकिकेने गुरुवारी नाट्यसंमेलनात एक वेगळाच इतिहास रचला... रसिकांनी एकांकिकेला केलेली गर्दी आणि या एकांकिकेची मनापासून केलेली स्तुती कलाकारांनाही समाधान देऊन गेली. पुण्यातील आंतरमहाविद्यालयीन विश्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाºया फिरोदिया करंडक स्पर्धेत या एकांकिकेने करंडकावरआपली मोहर उमटविल्यानंतर या एकांकिकेचे सर्वत्र कौतुक झाले... संमेलनातही या एकांकिकेची चर्चा रंगली होती. ही एकांकिका आवर्जून पाहा, असे सर्वजण एकमेकांना सांगत होते.नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावर ही एकांकिका सादर करण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांना दडपण होते. 

टॅग्स :९८ वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनमराठी