मुंबई : रस्ते घोटाळ्यात अडकलेल्या सहा कंत्राटदारांना वेळोवेळी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावूनही ते गैरहजर राहत असल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या अटकेची तयारी सुरु केल्याचे समजते. रस्ते घोटाळा प्रकरणी मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या तक्रारीवरुन आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पालिकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आर. के. मधानी, रेलकॉन इन्फ्रा प्रोजेक्टस लिमि., महावीर रोड इन्फ्रास्ट्रक्टर प्रा. लि., जे. कुमार, के. आर. कन्स्ट्रक्शन आणि आर.पी.एस. यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या सहा जणांविरोधात फसवणूक, खोटी कागदपत्रे तयार करणे आणि गुन्हेगारी कट रचणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान चौकशीसाठी ते गैरहजर राहिल्याने त्यांच्या विरोधात अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. याबाबत पोलीस उपायुक्त मनोज शर्मा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते संपर्कात येऊ शकले नाही. (प्रतिनिधी)
’ते’ सहा कंत्राटदार चौकशीसाठी गैरहजर
By admin | Updated: July 6, 2016 01:30 IST