Join us
Daily Top 2Weekly Top 5

सालेमला फाशी देणे योग्य नाही

By admin | Updated: February 19, 2015 02:44 IST

प्रदीप जैन खुनाप्रकरणी दोषी आढळलेला गँगस्टर अबू सालेमला फाशीची शिक्षा ठोठावणे योग्य नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने बुधवारी विशेष टाडा न्यायालयात केला़ अ‍ॅड़ सुदीप पासबोला यांनी हा युक्तिवाद केला़

बचाव पक्षाचा दावामुंबई : प्रदीप जैन खुनाप्रकरणी दोषी आढळलेला गँगस्टर अबू सालेमला फाशीची शिक्षा ठोठावणे योग्य नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने बुधवारी विशेष टाडा न्यायालयात केला़ अ‍ॅड़ सुदीप पासबोला यांनी हा युक्तिवाद केला़ ते म्हणाले, की सालेमला कठोर शिक्षा ठोठावली जाणार नाही, या अटीवरच भारताने सालेमचा ताबा पोर्तुगालकडून घेतला आहे़ असे असताना त्याला फाशीची शिक्षा ठोठवावी, अशी मागणी करणे योग्य नाही़ (प्रतिनिधी)