Join us  

साहेब, राष्ट्रपती व्हावेत हीच माझी इच्छा, आठवलेंच्या सौभाग्यवतींची 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 11:24 AM

रामदास आठवलेंच्या कविता सोशल मीडियात व्हायरल होतात. त्याचप्रमाणे त्यांचे विधानही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय असते. आठवले हे महत्वाकांक्षी नेते आहेत.

ठळक मुद्देरामदास आठवलेंच्या कविता सोशल मीडियात व्हायरल होतात. त्याचप्रमाणे त्यांचे विधानही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय असते. आठवले हे महत्वाकांक्षी नेते आहेत.

मुंबई - आपल्या संघर्षयमय वाटचालीतून सांगलीतील एका खेडेगावातून दलित चळवळीत काम करत पुढे आलेल्या रामदासचा प्रवास आज केंद्रीय मंत्रीरामदास आठवलेपर्यंत पोहोचला आहे. आपल्या हटक्या शैलीने आणि प्रसंगावधानता राखत घेतलेल्या निर्णयामुळे त्यांनी राजकारण स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलंय. सत्ता कोणाचीही असो, रामदास आठवले आणि रिपाइं पक्ष सत्ताधारीगटाचा सहकारी असतो. त्यामुळेच, रामदास आठवले नेहमीच चर्चेत असतात. रामदास आठवले यांच्या पत्नी  यांनी रामदास आठवले हे राष्ट्रपती व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. 

रामदास आठवलेंच्या कविता सोशल मीडियात व्हायरल होतात. त्याचप्रमाणे त्यांचे विधानही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय असते. अनेकदा आठवलेंना त्यांच्या कवितांवरुन ट्रोल करण्यात येते. याबद्दलही त्यांच्या पत्नीने आपलं मत व्यक्त केलं आहे. रामदास आठवले यांचे जगभरात फॉलोवर्स आहेत, काहीजण त्यांच्या कवितांचा विपर्यास करतात, विनोद करतात. पण, आम्हाला तसं वाटत नाही. ते कुठलाही विषय  नसताना कवित करू शकतात, ते एक शीघ्र कवी आहेत, अशा शब्दात सीमा आठवले यांनी रामदास आठवलेंच्या कवितांचं कौुतक केलंय. तसेच, कुणी सांगितलं तर ते माझ्यावरही कवित करतात, असेही त्यांनी म्हटलं.

आठवले हे महत्वाकांक्षी नेते आहेत. कदाचित, त्यामुळेच त्यांच्या पत्नीने त्यांच्याबद्दल महत्त्वाकांक्षा आणि इच्छा बाळगली आहे. रामदास आठवले हे सध्या मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. ते ज्यावेळी राज्यमंत्री झाले, त्यावेळी आम्हाला आनंदच झाला होता. पण, आता ते कॅबिनेट मंत्री व्हावेत आणि पुढील 10 ते 15 वर्षात ते राष्ट्रपती व्हावेत ही माझी अंत:करणापासूनची इच्छा आहे. राष्ट्रपती हे आपल्या देशातील सर्वोच्च स्थान असलेलं पद आहे, असे आठवलेंच्या पत्नी सीमा यांनी एका डिजिटल माध्यमाशी बोलताना म्हटले आहे.  

रामदास आठवले यांच्यासोबत 1992 मध्ये सीमा यांचं लग्न झालं. आमचं लग्न हे अरेंजमॅरेज होतं, लग्नावेळी ते समाजकल्याणमंत्री होते, अशा आठवणी सांगत सीमा आठवले यांनी त्यांच्या आयुष्यातील विविध पैलू उलगडताना जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.

टॅग्स :रामदास आठवलेकोरोना वायरस बातम्याराजकारणराष्ट्राध्यक्षमंत्री