मुंबई : मुंबईतील सिद्धिविनायक न्यासाला बीएसआय संस्थेच्या पुढाकाराने उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी आयएसओ प्रमाणपत्र देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सिद्धिविनायकाची पूजा केली. त्या वेळी मुख्यमंत्र्यांकडून सिद्धिविनायक न्यासाला आयएसओ प्रमाणपत्र बहाल करण्यात आले.याप्रसंगी मुख्यमंत्र्यांना सिद्घिविनायकाची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली. मंदिरातील व्यवस्थापन, सुरक्षा या निकषांवर ब्रिटिश स्टॅण्डर्ड इन्स्टिट्यूटने हे प्रमाणपत्र दिले आहे. महाराष्ट्रातील हे पहिलेच मंदिर आहे ज्याला आयएसओ हे प्रमाणपत्र मिळाले आहे.सिद्धिविनायक मंदिर मंडळ अनेक समाजोपयोगी कार्यांमध्ये पुढे असते. सिद्धिविनायक मंदिरात रोज हजारो भक्त दर्शन घेतात. या ठिकाणची शिस्तबद्धता आणि उत्कृष्ट व्यवस्थापनाचा उत्तम नमुना मानला जातो. सिद्धिविनायक मंदिराच्या नवीन इमारतीला २१ वर्षे पूर्ण झाली आहेत. म्हणून येथे विविध कार्यक्रमांचे आयोजनसुद्धा करण्यात आले होते. (प्रतिनिधी)
सिद्धिविनायक मंदिराला आयएसओचा दर्जा
By admin | Updated: May 21, 2015 01:14 IST