Join us

इस्माईल दरबार वादाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: February 4, 2015 02:36 IST

काम करणाऱ्या प्रकाश चौधरी या असिस्टन्ट डायरेक्टरला मारहाण केल्याप्रकरणी अंबोली पोलिसांनी मंगळवारी सकाळी दरबार यांचा पुत्र झायेदसह तिघांना अटक केली आहे.

मुंबई : बॉलीवूडमधील प्रसिद्ध संगीतकार इस्माईल दरबार वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या दरबार प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करणाऱ्या प्रकाश चौधरी या असिस्टन्ट डायरेक्टरला मारहाण केल्याप्रकरणी अंबोली पोलिसांनी मंगळवारी सकाळी दरबार यांचा पुत्र झायेदसह तिघांना अटक केली आहे. मारहाण होत असताना दरबारही तेथे उपस्थित होते, अशी तक्रार चौधरी यांनी दिली आहे.अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रमेश खडतरे यांच्या माहितीनुसार, ही मारहाण काल रात्री अकराच्या सुमारास एव्हरशाइन अपार्टमेन्टच्या पार्किंग लॉटमध्ये झाली. चौधरी यांनी पोलीस ठाण्याला दिलेल्या तक्रारीनुसार दरबार यांचे पुत्र झायेद, प्रॉडक्शन हाऊसमधील निशांत सिंग आणि मोहस्सीन या तिघांनी हॉकी स्टिक, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीवेळी दरबारही तेथे उपस्थित होते. या मारहाणीत चौधरी जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मारहाणीवेळी दरबार तेथे उपस्थित होते का, प्रश्नावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडतरे यांनी तसा उल्लेख तक्रारीत असल्याचे सांगितले. तर दरबार यांच्याविरोधातही गुन्हा दाखल असल्याची माहिती परिमंडळ नऊचे उपायुक्त सत्यनारायण चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिली.आरोपी आणि तक्रारदार यांच्यात पैशांवरून वाद होता, अशी माहिती पोलिसांना प्राथमिक चौकशीतून मिळाली आहे. आरोपी तक्रारदाराकडे आले होते. त्यांनी पार्किंग लॉटमध्ये बोलावून तक्रारदाराला मारहाण केल्याचे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)