Join us  

अमेरिकेच्या व्हिसासाठी इंग्रजी यायला हवे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2023 10:41 AM

बहुतांश व्हिसा प्रकारासाठी इंग्रजी येणे गरजेचे नाही. मात्र, तुम्ही कोणत्या प्रकारचा व्हिसा घेत आहात त्यावर ते अवलंबून आहे. काही व्हिसा प्रकारासाठी इंग्रजी भाषा येणे गरजेचे आहे. 

भारत हा वैविध्यपूर्ण असा देश आहे. तिथे अनेक प्रकारच्या बोलीभाषा आहेत. त्यामुळे अशा विविध भाषांसाठी अनुवादकाची सुविधा देण्यासाठी यू. एस. ॲम्बसी व कौन्सुलेटला मर्यादा आहेत. मात्र, ज्या भाषा सर्वाधिक बोलल्या जातात त्यांच्यासाठी अनुवादकाची सेवा उपलब्ध आहे. तुमच्या मुलाखतीच्या दिवशी तुम्हाला कोणत्या भाषेत मुलाखत द्यायची आहे, त्याचे प्राधान्य कळविणे गरजेचे आहे. जर अनुवादक उपलब्ध असेल तर तुम्हाला तुमच्या अधिकाऱ्यासोबतच्या मुलाखतीमध्ये तो सहकार्य करेल. यू. एस. कौन्सुलेट जनरल, मुंबई येथील कार्यालयामध्ये प्रामुख्याने गुजराती, हिंदी आणि मराठी भाषेसाठी अनुवादाची सुविधा उपलब्ध आहे, तर अन्य भाषांसाठी अनुवादाची सुविधा उपलब्धतेप्रमाणे प्राप्त होते.

- जर तुमच्या भाषेसाठी अनुवादक उपलब्ध झाला नाही तर तुम्ही तुमच्या मुलाखतीचे पुनर्नियोजन करू शकता.

- ज्या अर्जदारांना मुलाखतीसाठी अनुवादकाची गरज आहे, अशा अर्जदारांनी त्यांच्या स्थानिक ठिकाणी जिथे यू. एस. ॲम्बसी/कौन्सुलेट आहे तिथे अर्ज करावा. कारण तिथे त्या भाषेचा अनुवादक मिळण्याची शक्यता जास्त असते.

- अर्जदारांना स्वतःचा अनुवादक आणायची देखील परवानगी आहे. मुलाखत प्रक्रियेचे दडपण येऊ शकते, पण तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही आहोत.

- तुमची जर आणखी काही विनंती असेल तर आमच्या कर्मचाऱ्यांशी तुम्ही बोलू शकता. त्यासंदर्भात आमचे कर्मचारी पुरेपूर प्रयत्न करतील.

- आमचे कर्मचारी अनेक भाषा बोलतात आणि आम्ही तुमची विनंती मार्गी लावण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. भाषा ही तुमच्या मुलाखतीमध्ये अडथळा ठरू नये, त्यामुळे तुमची मुलाखत विनासायास व्हावी म्हणून आम्ही सर्वतोपरी मदत करतो.

- व्हिसा प्रक्रिया सुरळीत व व्यवस्थित होण्यासाठी तुम्ही व तुमचे कुटुंबीय कोणती भाषा बोलता व सर्व कुटुंबीयांना कोणती भाषा समजते त्या भाषेसंबंधी विनंती करावी.

 

टॅग्स :व्हिसा