Join us
Daily Top 2Weekly Top 5

इकबाल मिर्चीची पत्नी आणि मुले फरार आर्थिक गुन्हेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:07 IST

मुंबई : कुख्यात गॅंगस्टार इकबाल मिर्चीची पत्नी हजरा मेमन आणि जुनैद व असिफ मेमन ही दोन मुले यांना शुक्रवारी ...

मुंबई : कुख्यात गॅंगस्टार इकबाल मिर्चीची पत्नी हजरा मेमन आणि जुनैद व असिफ मेमन ही दोन मुले यांना शुक्रवारी विशेष पीएमएलए कोर्टाने फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले.

अंमलबजावणी संचालनालयाने कायदेशीर प्रक्रिया पूूर्ण करून या कुटुंबीयांची भारतात तसेच परदेशात या कुटुंबीयांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. डिसेंबर महिन्यात अंमलबजावणी संचालनालयाने या तिन्ही लोकांना आर्थिक गुन्हे कायद्यान्वयेप्रमाणे आर्थिक गुन्हेगार घोषित करावे यासाठी विशेष न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, देशभरातील सुमारे ९६ कोटींच्या १५ मालमत्ता आणि सहा ब’ क खात्यातील १.९ कोटी रुपये जप्त करण्याची परवानगी मागितली होती.

इक्बाल मिर्चीचे २०१३ मध्ये लंडन येथे निधन झाले. त्यापूर्वी त्यांच्यावर मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांचा अभ्यास करून अंमलबजावणी संचालनालयाने गुन्हे दाखल केले होते.