Join us
Daily Top 2Weekly Top 5

वडाळा युवक कोठडी मृत्यू प्रकरणी प्रेमी युगुलाची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 03:55 IST

विजय सिंह याचे पोस्टमार्टेम जेजे व केईएम रुग्णालयातून करण्यात येत आहे.

मुंबई : छेडछाड केल्याच्या कारणावरून पोलिसांच्या मारहाणीतील विजय सिंह याच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या प्रेमी युगुलाची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

विजय सिंह याचे पोस्टमार्टेम जेजे व केईएम रुग्णालयातून करण्यात येत आहे. त्याचा अहवाल अद्याप आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. वडाळा टीटी पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी अदखलप्राप्त गुन्हा दाखल झालेल्या विजय सिंह याचा मारहाण, तसेच मानसिक धक्क्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर दोघा अधिकाऱ्यांसह पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले. मात्र खोटी तक्रार देणाºया प्रेमी युगुलाविरुद्ध कारवाईची मागणी मृताचे नातेवाईक व नागरिकांकडून करण्यात आली. त्यानुसार देवेंद्र्र दशरथ व आफरीन यांच्यावर बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.