Join us  

माणदेशी महोत्सवात उलगडले मानवी शरीराचे अंतरंग; मुंबईकरांच्या ज्ञानात भर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 1:45 AM

विज्ञान-तंत्रज्ञान हे खºया अर्थाने खूप अवघड, मोठे किंवा कठीण नसून, आपण स्वत:वर प्रयोग करून त्याचा अनुभव घेण्याची संधी येथील स्टॉलवर आपल्याला मिळते.

सीमा महांगडे

मुंबई : गावाकडचे किल्ले, गावाची चावडी, घराचा ओटा, पडवी यांसारख्या सेल्फी पॉइंट्ससोबत सेल्फी घेताना माणदेशी महोत्सवात मुंबईकराना मानवी शरीराची रचना, गणिताचे फन मॉडेल्स, फिजिक्सचे बेसिक कन्सेप्ट यांची माहितीही मिळणार आहे.

गावाकडची संस्कृती आणि महिला सक्षमीकरणाची झलक दाखविणारा माणदेशी महोत्सव विविध कारणांनी आणि उपक्रमांनी मुंबईकरांना आपल्याकडे आकर्षित करत आहेच. मात्र, यातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या महोत्सवात असणारे शैक्षणिक स्टॉल. चंद्रग्रहण, सूर्यग्रहण का होते? आपल्याला अ‍ॅसिडिटीचा त्रास का होतो? आपल्या शरीराची नेमकी शरीररचना काय? दिवस रात्रीचा खेळ म्हणजे नक्की काय? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे सहज-सोप्या-साध्य भाषेत महोत्सवातील या शैक्षणिक स्टॉलवर मिळतात.

माणदेशी महोत्सवाच्या निमित्ताने तेथे शहरी आणि ग्रामीण भागातील मुले व त्यांच्या पालकांना या निमित्ताने का होईना, विज्ञानाशी गट्टी करून द्यावी, या उद्देशाने अगस्त्या फाउंडेशन या शैक्षणिक संस्थेने या महोत्सवात आपला स्टॉल उभा केला आहे. तेथे येणाऱ्या प्रत्येक मुंबईकराला ते महोत्सवाच्या विविध चवी, रंगासोबत शिक्षणाचे धडे देण्याचा प्रयत्न करत आहेत.

रुग्णालयांमध्ये असणारा स्टेथोस्कोप घरीही करता येतो, पृथ्वी गोल नसून अंडाकृती असूनही स्थिर कशी, याचा प्रत्यय साध्या कप आणि धाग्याच्या साहाय्यानेही समजावता येते, भौतिक शास्त्रामधील प्रेशर, डेन्सिटी सारख्या संज्ञा सोप्या भाषेत प्रात्यक्षिकांमधून दाखविता येत असल्याची माहिती ही टीम देते.आतापर्यंत १८ जिल्ह्यांत दिले धडे!अगस्त्या फाउंडेशनची ६ जणांची टीम या महोत्सवाला उपस्थित असून, ती येथे येणाºया लोकांना आवर्जून हे विज्ञान-तंत्रज्ञानाची सांगड घालणारे शैक्षणिक धडे देत आहे. आत्तापर्यंत राज्याच्या १७ ते १८ जिल्ह्यांत अगस्त्या फाउंडेशनच्या टीमने जाऊन या प्रकारच्या शैक्षणिक साहित्य आणि अभ्यासाचा प्रचार केला आहे. विशेषत: ग्रामीण भागातील लोकांना ज्यांचा पुस्तकी अभ्यासाकडे आधी कल कमी होता, त्यांना विविध प्रात्यक्षिकांद्वारे ते शैक्षणिक धडे देत आहेत.तंत्रज्ञानाची सक्षमता समजावून देणारे स्टॉलविज्ञान-तंत्रज्ञान हे खºया अर्थाने खूप अवघड, मोठे किंवा कठीण नसून, आपण स्वत:वर प्रयोग करून त्याचा अनुभव घेण्याची संधी येथील स्टॉलवर आपल्याला मिळते. त्यामुळे महिला सक्षमीकरणासह विद्यार्थी आणि पालकांनाही विज्ञान-तंत्रज्ञानाची सक्षमता समजावून देणारे असे स्टॉल माणदेशी महोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

टॅग्स :म्हाडा