Join us
Daily Top 2Weekly Top 5

परांजपे बंधूंची चौकशी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:06 IST

फसवणूक प्रकरण ; अद्याप अटक नाहीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नामांकित बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधूंना फसवणूक प्रकरणी ...

फसवणूक प्रकरण ; अद्याप अटक नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : नामांकित बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधूंना फसवणूक प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी गेल्या आठवड्यात ताब्यात घेतले होते. त्यांची अजूनही चौकशी सुरू असून यात कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

पुण्यातील राहत्या घरातून श्रीकांत पुरुषोत्तम परांजपे आणि शशांक पुरुषोत्तम परांजपे या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांची शनिवारी चौकशी करीत त्यांना सोडून देण्यात आले. मात्र, पुन्हा सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. मात्र, अटकेची कारवाई करण्यात आली नाही.

वसुंधरा डोंगरे या महिलेने त्यांच्यावर खोटी कागदपत्रे बनवून विश्वासघात आणि फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.