Join us

सामान्य मुलगा बनला इंटरनॅशनल फोटोग्राफर

By admin | Updated: May 11, 2015 01:32 IST

बंगालमध्ये राहत असलेला १२ वर्षांचा विकी फोटोग्राफी शिकण्यासाठी घरातून पळून गेला आणि दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोहोचला.

ठाणे : वुई नीड यू या संस्थेतर्फे इंटरनॅशनल फोटोग्राफ र विकी रॉय याच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन ठाण्यात करण्यात आले होते. नरेंद्र बल्लाळ सभागृहात शनिवारी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमात घरातून पळून जाऊन फोटोग्राफी शिकणाऱ्या विकीने आपले आयुष्य प्रेक्षकांसमोर उलगडले.बंगालमध्ये राहत असलेला १२ वर्षांचा विकी फोटोग्राफी शिकण्यासाठी घरातून पळून गेला आणि दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोहोचला. मात्र, सलाम बालक ट्रस्टने त्याला आसरा दिला आणि विकीला आवड असणाऱ्या करिअरचे शिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यानंतर, विकीने काढलेल्या फोटोंचे प्रदर्शन भरवले. हे प्रदर्शन यू ट्यूबच्या माध्यमातून जगासमोर आणले. त्यानंतर, वर्ल्ड सेंटर रिकन्स्ट्रक्शनच्या फोटोग्राफीसाठी निवड झाली.