Join us

कल्याण येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप

By admin | Updated: December 30, 2014 22:30 IST

आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल सोहळ्याचा समारोप राज्ज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

कल्याण: शहर परिसरात प्रथमच दिग्दर्शक संदीप गायकर , संदीप नवरे व आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने आयोजित आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल सोहळ्याचा समारोप राज्ज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.यावेळी महापौर कल्याणी पाटील व उपमहापौर राहुल दामले यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. व शहर परिसरातील प्रलंबित प्रकल्प,विकास आराखडा ,सेवासुविधा प्रश्न आदी भेडसावणार्या समस्याचे विवेचन केले . येथील वासुदेव बळवंत फडके मैदानावर चार दिवसीय आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल झाला या फेस्टिवल सोहळ्यात विविध भाषेतील सुमारे ३५ चित्रपट तंबूत दाखविण्यात आले कल्याण शहरात प्रथमच असा अशा दिमाखदार सोहळ्याचे आयोजन केल्याने उपमहापौर राहुल दामले यांनी आयोजकांचे कौतुक केले व मुख्यमंत्र्यांपुढे कल्याणच्या समस्या मांडल्यात. तर आमदार नरेंद्र पवार यांनी शहराला भेडसावणार्या समस्यांचा संपूर्ण पाढाच वाचून दाखविला .यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मार्गदर्शनपार भाषणात दोन दिवसात या शहराचा विकास आराखडा मंजूर होईल, असे सांगून महापालिका क्षेत्रात भेडसावणाऱ्या समस्यावर लवकरात लवकर निर्णय घेऊ, अशी ग्वाही यावेळी दिली .तसेच जे काही प्रलंबित प्रकल्प त्यावर देखील संबधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून ठोस निर्णय घेणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले व पुढच्या वर्षापासून या फेस्टिव्हलला राज्यशासनाच्या वतीने मदत करण्यात येणार असल्याचे आश्वासन देत हा सोहळा यशस्वीरीत्या साकार केल्या बद्दल आयोजकांना शुभेच्या दिल्या .