Join us

आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासावरील बंदी 14 एप्रिल पर्यंत, आंतरराष्ट्रीय हवाई मालवाहतुकीला परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 20:51 IST

आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासावरील बंदी 14 एप्रिल पर्यंत, आंतरराष्ट्रीय हवाई मालवाहतुकीला परवानगी ..

आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासावरील बंदी 14 एप्रिल पर्यंत, आंतरराष्ट्रीय हवाई मालवाहतुकीला परवानगी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनामुळे भारतात आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासावर लादण्यात आलेली बंदी 14 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आली आहे. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) ने याबाबत हवाई वाहतूक कंपन्यांना निर्देश जारी केले आहेत. या निर्बंधामधून हवाई मालवाहतुकीला वगळण्यात आले आहे. 

डीजीसीएने परवानगी दिलेली विशेष उड्डाणे व पूर्णत: हवाई मालवाहतूक करणारी विमाने यांना हे निर्बंध लागू होणार नाहीत, असे डीजीसीए ने स्पष्ट केले आहे.