Join us  

संपकरी प्राध्यापकांना हवी मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 6:00 AM

प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक प्रतिसाद मिळाला असला, तरी लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय मंगळवारी एमफुक्टो संघटनेने जाहीर केला.

मुंबई : प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक प्रतिसाद मिळाला असला, तरी लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय मंगळवारी एमफुक्टो संघटनेने जाहीर केला. बुधवारी शिक्षणमंत्र्यांकडून बैठकीचे इतिवृत्तमिळाल्यानंतरही, कोणत्याही मागणीवर ठोस आश्वासन न मिळाल्याने, संघटनेने आता या प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीची मागणी केली आहे.मंगळवारी मंत्रालयात  बोलाविलेल्या विशेष बैठकीत प्राध्यापकांच्या बहुतांश संघटनांना आमंत्रित करण्यात आले होते. दीड तासांच्या या बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा झाली. राज्य सरकारने सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर त्वरित त्या संदर्भातील कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनीया वेळी दिले. इतर प्रश्नासंदर्भातही वित्त विभागाकडे अहवाल पाठविण्यात येईल. त्यानंतर, अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचेशिक्षणमंत्र्यांकडून सांगण्यात आल्याचे इतिवृत्तात नमूद आहे. मात्र, शिक्षणमंत्र्यांच्या या आश्वासनावर एमफुक्टो संघटनेचे समाधान झालेले नाही. या प्रकरणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मध्यस्थी करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, प्राध्यापकांच्या संपामुळे बुधवारी मुंबईसह कोकण, पुणे, नाशिक येथील महाविद्यालये बंद असल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुंबईत मात्र, बंदचा तसा फारसा परिणाम दिसला नाही.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसबातम्या