Join us

अविनाश भोसले व मुलाला २४ फेब्रुवारीपर्यंत अंतरिम दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:07 IST

अविनाश भोसले व मुलाला २४ फेब्रुवारीपर्यंत अंतरिम दिलासाकठोर कारवाई न करण्याचे ईडीचे आश्वासनफेमा प्रकरण : कठोर कारवाई ...

अविनाश भोसले व मुलाला २४ फेब्रुवारीपर्यंत अंतरिम दिलासा

कठोर कारवाई न करण्याचे ईडीचे आश्वासन

फेमा प्रकरण : कठोर कारवाई न करण्याचे ईडीचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले व त्यांचा मुलगा अमित भोसले यांच्यावर २४ फेब्रुवारीपर्यंत कारवाई करणार नाही, असे आश्वासन ईडीने उच्च न्यायालयाला सोमवारी दिले. त्यावर न्यायालयाने अविनाश व अमित भोसले यांना ईडीने बजावलेल्या समन्सनुसार १७ फेब्रुवारी रोजी ईडी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले.

ईडीने १० फेब्रुवारी रोजी बजावलेले समन्स व परकीय चलन नियमन कायद (फेमा) अंतर्गत नोंदविलेला गुन्हा रद्द करण्यासाठी पुण्याचे व्यावसायिक अविनाश भोसले व त्यांचा मुलगा अमित भोसले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सोमवारच्या सुनावणीत ईडीने अविनाश व अमित भोसले यांना पुढील सुनावणीपर्यंत अटक करणार नाही, असे न्यायालयाला सांगितले. त्यामुळे न्यायालयाने अविनाश व अमित भोसले यांना १७ फेब्रुवारीला ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले.

ईडीने या आठवड्यात अविनाश भोसले याच्या पुणे, मुंबई आणि कोल्हापूर येथील कार्यालयांवर छापा मारला तसेच १० फेब्रुवारी रोजी समन्स बजावून त्याच दिवशी चौकशीसाठी ईडीच्या मुंबई कार्यालयात हजर राहण्यास सांगितले. पुण्यात असतानाही आपल्याला व मुलाला जाणूनबुजून त्याच दिवशी मुंबई कार्यालयात हजर राहण्यास सांगितले, असे भोसले यांनी याचिकेत म्हटले आहे.