Join us
Daily Top 2Weekly Top 5

आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:08 IST

मुंबईमेन अगेन्स्ट व्हायोलन्स अँड अब्युस (मावा) या संस्थेने ‘युवा अभिव्यक्ती २०२१’ या दोनदिवसीय आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धांचे विनामूल्य आयोजन ...

मुंबई

मेन अगेन्स्ट व्हायोलन्स अँड अब्युस (मावा) या संस्थेने ‘युवा अभिव्यक्ती २०२१’ या दोनदिवसीय आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धांचे विनामूल्य आयोजन केले आहे. २० व २१ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन माध्यमाद्वारे होणाऱ्या या स्पर्धेत 'विषारी मर्दानगी' या विषयावर निबंध स्पर्धा, पथनाट्य, घोषवाक्य, समूह गायन, वक्तृत्व, भित्तिचित्र व लघुपट निर्मिती स्पर्धांचे आयोजन आले आहे. समाजात असलेली विषारी मर्दानगी आणि त्यातून होत असलेली हिंसा व अत्याचार थांबवून एक हिंसामुक्त समृद्ध समाज निर्माण होण्याच्या अनुषंगाने युवकांचे कलाविष्कार सादर व्हावेत, या हेतूने या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. मुंबई विद्यापीठ, एस.एन.डी.टी.; तसेच इतर विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी या सहभागी होऊ शकतील. स्पर्धेसाठी yuva.abhivyakti123@gmail.com या इ-मेलवर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.