Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलुंडमध्ये वाहतूक पोलिसांना शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:06 IST

मुंबई : मुलुंडमध्ये नो पार्किंगमध्ये दुचाकी लावणाऱ्या तरुणाला हटकल्याच्या रागात त्याने वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत असभ्य वर्तन केल्याची घटना ...

मुंबई : मुलुंडमध्ये नो पार्किंगमध्ये दुचाकी लावणाऱ्या तरुणाला हटकल्याच्या रागात त्याने वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत असभ्य वर्तन केल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी जतीन सतरा या दुकानदाराला ताब्यात घेतले आहे.

गुरुवारी सकाळी मुलुंड वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई ज्ञानेश्वर वाघ आणि गोरख सानप हे आर आर टी नो पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या गाड्यांवर कारवाई करीत होते. त्याच दरम्यान दुकानासमोर पार्क केलेल्या जतीनच्या दुुचाकीचा वाहतूक पोलीस फोटो काढत कारवाई केली. याच रागात जतीनने पोलिसांना अश्लील भाषेत शिवीगाळ सुरू केली.

वाहतूक पोलिसांनी मुलुंड पोलिसांना घटनेची माहिती देत, मदतीसाठी बोलावून घेतले. त्यानुसार मुलुंड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जतीनला ताब्यात घेत, कारवाई केली आहे. वाहतूक पोलिसांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुलुंड पोलीस अधिक तपास करत आहेत.