पुणे : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या पायाभूत चाचण्यांचे नियोजन कोलमडलेले असताना आॅक्टोबर - नोव्हेंबरमध्ये घेण्यात येणाऱ्या चाचण्यांसाठी केवळ पंधरा त्रयस्थ संस्थांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे परिषदेतर्फे त्रयस्थ संस्थांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमांतर्गत राज्य शासनाने सर्व शाळांतील विद्यार्थ्यांच्या चाचण्या घेण्याचा निर्णय घेतला. मात्र,परीक्षांच्या नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. १५ ते ३० सप्टेंबर या कालावधीत पायाभूत चाचणी घेतली जाणार आहे. परंतु, काही शाळांना अद्याप गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकाच मिळाल्या नाहीत. त्यातच आता नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या चाचण्यांसाठी त्रयस्थ संस्थांकडून मागविलेल्या अर्जांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. शिक्षणक्षेत्रात चांगले काम करणाऱ्या ‘प्रथम’ सारख्या संस्थांची नावे चर्चेत होती. परंतु, प्रथमने यासाठी अर्ज केला नसल्याची माहिती समोर आली आहे.राज्यभरातील सर्व शाळांमध्ये नोव्हेंबर महिन्यात दुसरी चाचणी घेतली जाणार असल्याचे शिक्षण विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे. या चाचण्यासाठी राज्यातील २ हजार १०० ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. परिणामी राज्यातील एकूण ४ हजार २०० शाळांमध्ये हे मूल्यमापन करण्यात येणार आहे. परंतु,या एवढ्या शाळांसाठी आवश्यक असलेल्या त्रयस्थ संस्था अद्याप परिषदेकडे आल्या नाहीत. त्यामुळे चाचण्यांच्या माध्यमातून मूल्यमापन कसे करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जान्हवी फाउंडेशन पुणे, अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान, धुळे,नवनिर्माण युवक क्रीडा मंडळ, बीड, इंडियन मेंटरल हेल्थ सव्हिर्सेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे, अशा सुमारे १५ संस्थांनी परिषदेकडे अर्ज सादर केले आहेत. अर्ज करणाऱ्या कोणत्या प्रकारच्या आहेत, याबाबत अद्याप वर्गीकरण परिषदेने अद्याप केलेले नाही. टठ
चाचणीसाठी संस्था मिळेनात
By admin | Updated: September 21, 2015 02:19 IST