Join us
Daily Top 2Weekly Top 5

अत्यावश्यक बाब म्हणून नायर रुग्णालयात दोन एमआरआय मशीन बसवा - आमदार सुनील प्रभू

By मनोहर कुंभेजकर | Updated: June 18, 2024 18:55 IST

नायर रुग्णालयातील सदर एमआरआय मशीनचे आर्यमान २०१९ साली संपूष्टात आले आहे, आमदार सुनील प्रभू यांची पालिका आयुक्तांकडे मागणी

मुंबई-बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात नायर रुग्णालय, सायन रुग्णालय व के. ई. एम. रुग्णालय ही प्रमुख आरोग्य सेवा रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमध्ये मुंबई मधील पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे व शहरी भागातील नागरीक मोठ्या प्रामाणात आरोग्य सेवांचा लाभ घेतात. फक्त नायर रुग्णालयातच भरती असलेले सर्वसारधारण दहा ते बारा रुग्ण व नवीन येणा- यापैकी दहा ते बारा रुग्णांची एमआरआय तपासणी सुचविली जाते.

नायर रुग्णालयातील एमआरआय मशीन मागील दोन वर्षांपासून बंद आहे.त्यामुळे अत्यावश्यक बाब म्हणून नायर रुग्णालयात दोन एमआरआय मशीन बसवा अशी मागणी उद्धव सेनेचे मुख्य प्रतोद,आमदार सुनील प्रभू यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या कडे एका पत्राद्वारे केली आहे.

नायर रुग्णालयातील सदर एमआरआय मशीनचे आर्यमान २०१९ साली संपूष्टात आले आहे. सदर मशीन सुरु होत नाही व दुरुस्त देखील केली जाऊ शकत नाही. यामुळे नाईलाजाने येथे येणा-या चिकीत्सा पॅथोलॉजी लॅब मध्ये जावून जास्त पैसे देऊन एमआरआय चाचणी करुन घ्यावी लागते किवा सायन रुग्णालयात जावे जागते. यामुळे रुग्णांचे व रुग्णांच्या नातेवाईकांचे प्रचंड हाल होतात असे आमदार सुनील प्रभू यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणले आहे.

टॅग्स :सुनील प्रभू