Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाजार व उद्यान समिती अध्यक्षांचा पहाणी दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:06 IST

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सध्याच्या कोरोनाच्या काळातही के. पूर्व मरोळ, आणि के. पश्चिम वॉर्डांच्या अंधेरी पश्चिम विभागातील जीर्णावस्थेतील ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सध्याच्या कोरोनाच्या काळातही के. पूर्व मरोळ, आणि के. पश्चिम वॉर्डांच्या अंधेरी पश्चिम विभागातील जीर्णावस्थेतील बाजार व तेथील परिस्थितीचा मुंबई पालिकेच्या बाजार व उद्यान समिती अध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक ५९ च्या नगरसेविका प्रतिमा खोपडे यांनी नुकताच आढावा घेतला.

दोन्ही विभागातील मंडईचे सर्व प्रश्न साेडविण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, तसेच वर्सोवा मतदारसंघात बहुउद्देशीय भवन उभारण्याच्या कामासंबंधी सहाय्यक आयुक्तांकडून पाहणी करून काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही खोपडे यांनी दिली. यावेळी महापालिकेच्या उद्यान व बाजारच्या सहाय्यक आयुक्त, अधिकारी यांच्यासह शिवसेनेचे अंधेरी पूर्व विधानसभा संघटक प्रमोद सावंत, उपविभाग प्रमुख राजेश शेट्ये व प्रसाद आयरे, के. पूर्वच्या प्रभाग समिती अध्यक्षा प्रियांका सावंत, शाखाप्रमुख सतीश परब, दयानंद कड्डी आदी उपस्थित हाेते.

..............................