प्रशांत शेडगे - पनवेल
पनवेल परिसरात रोजगार उपलब्ध असतानाही बेरोजगार तरूण- तरूणींनी त्याकडे पाठ फिरवली आहे. रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राच्या वतीने काही दिवसापूर्वी घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात जागा जास्त आणि उमेदवार कमी अशी परिस्थिती दिसून आली. मोठया प्रमाणात जाहिरात करूनही या मेळाव्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे उघड झाले आहे.
पनवेलचे नागरिकरण झपाटय़ाने वाढत आहे. दरवर्षी येथील शैक्षणिक संस्थांमधून दहावी, बारावी त्याचबरोबर पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेऊन हजारो तरूण - तरूणी बाहेर पडतात. त्यांना मनासारखी नोकरी न मिळणो, त्याचबरोबर कुठे कुठे रोजगाराच्या संधी आहेत त्याबाबत योग्य माहिती नसणो या सारख्या अनेक अडचणी येतात. या भागात तळोजा आणि पातळगंगा या दोन औद्योगीक वसाहती आहेतच. त्याचबरोबर कामोठे जवाहर इंडस्ट्री त्याचबरोबर पनवेल इंडस्ट्रीज इस्टेट येथे स्मॉल स्केल इंडस्ट्री असून त्या ठिकाणीही मनुष्यबळाची गरज आहे. त्याचबरोबर पनवेल, नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघर या परिसरात शोरूम, मॉल्स, त्याचबरोबर वाहतुकदार, बिल्डर यांची मोठमोठी कार्यालये आहेत येथेही रोजगाराची संधी उपलब्ध आहे.
कळंबोली स्टील मार्केटचाच विचार केला तर येथे बिमा, बिस्मा आणि स्टील चेंबरमध्ये तीन चार हजार कार्यालये आहेत. तेथे वाहतुकदार, विविध मालाची आयात आणि निर्यात करणा:या व्यापा:यांची कार्यालये आहेत. पनवेल परिसरात आंतराष्ट्रीय प्रकल्प येत असल्याने तसेच चांगल्या पायाभूत सुविधा असल्याने या भागात अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. या ठिकाणी बेरोजागर तरूण- तरूणी पोहचाव्यात या उद्देशाने पनवेल येथील रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात. इतकेच नाही तर मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने या कार्यालयाकडून विविध सामाजिक संस्थाना बरोबर घेऊन रोजगार मेळावे घेण्यात येतात. पनवेलमध्ये गेल्या महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याबाबत संबधीत कार्यालयाच्या वतीने सर्व अस्थापनांना कळविण्यात आले होते. त्यानुसार ऑन द स्पॉट रोजगाराची संधी उपलब्ध होती. यावेळी सुमारे 6क्क् रिक्त पदे भरावयाची होती. मात्र यावेळी फक्त 36क् जणांनीच सहभाग घेतला होता. म्हणजे 45 टक्के जागा रिक्त राहिल्या त्यापैकी फक्त 83 जणांनाच रोजगार मिळाला असल्याचे रोजगार केंद्राकडून सांगण्यात आले.
पहिले नोकरीसाठी कॉल केले जायचे मात्र आता वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. त्या माध्यमातून सर्व माहिती दिली जाते मात्र बेरोजगार तरूण- तरूणी कोणते कोणते करंट जॉब आहेत ते वेबसाईटवर पाहत नाही. परिणामी रोजगार मेळाव्याकडे उमेदवार पाठ फिरवत असल्याचे आमचे निरीक्षण आहे
- सागर मोहिते,
रोजगार व स्वयंरोजगार
मार्गदर्शन अधिकारी, पनवेल