लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारतीय नौदलातील ३२ वर्षांच्या सेवेनंतर आयएनएस गंगा ही युद्धनौका रविवारी निवृत्त झाली. गोदावरी वर्गातील ही युद्धनौका शनिवारी अरबी समुद्रातील ४५ दिवसांची अखेरची टेहळणी संपवून मुंबई बंदरात दाखल झाली. भारतीय नौदलाने स्वदेशीचे धोरण स्वीकारल्यानंतर बनविण्यात आलेल्या सुरुवातीच्या युद्धनौकांमध्ये आयएनएस गोदावरीचा समावेश होतो. माझगाव गोदीत बांधण्यात आलेली आयएनएस गंगा ३० डिसेंबर १९८५ रोजी भारतीय नौदलात दाखल झाली होती. १२५ मीटर लांबी आणि ४ हजार २०० टन वजनाच्या या नौकेवर ३० अधिकारी आणि तीनशे जवानांचा ताफा कार्यरत होता.
३२ वर्षांच्या सेवेनंतर आयएनएस गंगा निवृत्त
By admin | Updated: May 29, 2017 04:56 IST