Join us  

केईएममधील भ्रूण प्रकरणाची आता खात्यांतर्गत चौकशी, पालिकेचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 1:14 AM

मुंबई : महापालिकेच्या केईएम रुग्णालयात मानवी भ्रूण मांजरीने खाल्ल्याच्या घटनेच्या तपासणीत तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोेणत्याही प्रकारच्या संशयास्पद हालचाली दिसून ...

मुंबई : महापालिकेच्या केईएम रुग्णालयात मानवी भ्रूण मांजरीने खाल्ल्याच्या घटनेच्या तपासणीत तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोेणत्याही प्रकारच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या नाहीत. प्राथमिक चौकशीत जैविक कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराचा दोष आढळून न आल्याने आता खात्यांतर्गत चौकशीचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.केईएम रुग्णालयातील जैविक कचरा कक्षातून मांजरीने भ्रूण पळवून खाल्ल्याचे आढळून आले होते. गेल्याच आठवड्यात या रुग्णालयात उपचार घेताना ईसीजी यंत्रातील बिघाडामुळे भाजलेला तीन महिन्यांचा प्रिन्स राजभर मरण पावला होता. घडलेल्या या घटनमुळे गोंधळ उडाल्यामुळे पालिकेला बदनाम करण्यासाठी कोणीतरी जाणूनबुजून हे घडवून आणले असावे, असा संशय केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी व्यक्त केला.या घटनेच्या चौकशीसाठी नियुक्त समितीने रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र प्राथमिक चौकशीत या घटनेत कचरा उचलणारा ठेकेदार दोषी आढळला नाही. शिवाय या वेळी आक्षेपार्ह काहीच आढळले नाही. त्यामुळे ठेकेदारावर कारवाई करता येणार नाही. मात्र या प्रकरणाच्या चौकशीसाठी खात्यांतर्गत चौकशी नेमल्याचे आरोग्य खात्याच्या एका अधिकाºयाने सांगितले.अशी लावली जाते कचºयाची विल्हेवाटकेईएम रुग्णालयाच्या आॅर्थोपेडिक विभागाच्या कोपºयात प्रवेशद्वार क्रमांक ७ जवळ जैविक कचरा कक्ष आहे. हा कक्ष दररोज सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू असतो. त्यानंतर तो कुलूप लावून बंद केला जातो. तर रविवारी हा कक्ष पूर्ण दिवस बंद ठेवण्यात येतो. त्याच्या बाजूच्या छोट्या खोलीत एक कर्मचारी रुग्णालयाच्या विविध वॉर्डमधून येणाºया जैविक कचºयाच्या पिशव्यांची नोंद ठेवतो.यामध्ये वॉर्ड क्रमांक, पिवळी-लाल पिशवी, कॅन अशी नोंद केली जाते. पिवळ्या पिशवीत निकामी झालेले अवयव तर लाल पिशवीत ग्लोव्हज, सुया, इंजेक्शन्स अशी वर्गवारी करून हा कचरा आणला जातो. हा कचरा उचलण्यासाठी आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ठेकेदाराची गाडी दोन वेळा येते.ठेकेदाराची गाडी या ठिकाणी जेव्हा दोन वेळा येते तेव्हा होणाºया दोन फेऱ्यांमध्ये दोन वेगवेगळ्या वर्गवारीतील कचरा उचलण्यात येतो. त्यानुसार एकदा पिवळ्या तर एकदा लाल पिशव्या आणि कॅन उचलले जातात. त्यानंतर दुपारी ३ नंतर रुग्णालयातून कचरा आणला जात नाही. तो वॉर्डमध्येच ठेवला जातो. हा कचरा दुसºया दिवशी सकाळी सफाई कर्मचारी कक्षात आणतात.

टॅग्स :केईएम रुग्णालय