ठाणे: जिल्ह्यातील मनोर-वाडा- भिवंडी तसेच माणकोली- अंजुर- चिंचोटी या दोन्ही बीओटी प्रकल्पांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी खासदार चिंतामन वनगा यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.आदिवासी जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत तत्कालीन बांधकाम मंत्री व तत्कालीन कार्यकारी अभियंता अगवणे यांनी संगनमताने बोगस निविदा काढल्या. निविदा पात्रता पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना डावलून आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना शेकडो कोटी रुपयांची लाच घेऊन कामे देण्यात आल्याचा आरोप त्यांनी निवेदनात केला आहे. मूळ निविदेच्या ५० टक्केपर्यंत काम अपूर्ण असतानाही टोल वसूलीला परवानगी दिली आहे. या प्रकरणात गौंडबंगाल असून याची लाचलुतपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी केल्यास सत्य समोर येईल, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)गौणखनिज कर दंडासह वसूल कराआॅक्टोबर २०१० पासून मनोर- वाडा-भिवंडी या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरु झाले. या रस्त्यासाठी वापरण्यात आलेल्या गौणखनिज कर वसूलीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र महसूल विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. संबंधितांकडून गौणखनिजाच्या करासोबत दंडाची वसुली करावी, अशी मागणीही खासदार वनगा यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे केली आहे.
बीओटी प्रकल्पांची चौकशी करा
By admin | Updated: June 19, 2015 00:08 IST