Join us
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक अत्याचार प्रकरणी भोंदूबाबा अटकेत

By admin | Updated: January 7, 2015 01:18 IST

एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चारकोप पोलिसांनी अनिल दामोदर भराटे (६७) या भोंदूबाबाला अटक केली आहे.

मुंबई : एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चारकोप पोलिसांनी अनिल दामोदर भराटे (६७) या भोंदूबाबाला अटक केली आहे. गरीब घरच्या मुलींना शिक्षण देतो, असे सांगून हा बाबा या मुलींना आपल्या घरी आणत असे. कांदिवली परिसरात राहणाऱ्या एका गरीब कुटुंबाला या बाबाने हेरले. तुमच्या मुलीला चांगले शिक्षण देतो, असे सांगून तिला त्याने विरार येथील खोलीवर नेले. गेले कित्येक महिने हा बाबा ती रात्री झोपेत असताना पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करायचा. शनिवारी रात्री त्याने तिला मद्य पाजून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असता, त्या मुलीने तेथून पलायन करून कांदिवलीतील घर गाठले. घडलेला प्रकार आईला सांगितला, त्यानंतर तिच्या आईने चारकोप पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्र ारीनंतर चारकोप पोलिसांनी बाबाला अटक केली. काही वर्षांपूर्वी हा बाबा एका बँकेत कामाला होता, त्यानंतर त्याने बाबागिरीचा व्यवसाय सुरू केला. त्याने नागपूर येथे मठ सुरू केला, त्यानंतर आजूबाजूच्या गावातील गरीब लोकांवर हा मोफत उपचार करत असे. यामुळे पीडित मुलीच्या घरच्या लोकांचा या बाबावर विश्वास बसला होता. (प्रतिनिधी)