Join us

रेल्वेमध्ये दगड लागून प्रवासी जखमी

By admin | Updated: November 14, 2016 04:33 IST

कल्याण-मुंबई असा प्रवास करणारे राकेश शर्मा हे रेल्वेच्या दारात उभे होते. याच गाडीवर कल्याण-ठाकुर्लीदरम्यान दगड भिरकावल्याने शर्मा हे गंभीर

कल्याण : कल्याण-मुंबई असा प्रवास करणारे राकेश शर्मा हे रेल्वेच्या दारात उभे होते. याच गाडीवर कल्याण-ठाकुर्लीदरम्यान दगड भिरकावल्याने शर्मा हे गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. गुरुवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेची नोंद अद्याप झालेली नाही. घटनेचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांनी सारवासारव करणारी उत्तरे दिली आहेत. राकेश शर्मा यांच्यासोबत त्यांचे नायर नामक मित्र होते. गाडीच्या दरवाजाजवळ ते उभे होते. इतक्यात, एक दगड शर्मा यांच्या डोक्याला लागला. (प्रतिनिधी)