Join us
Daily Top 2Weekly Top 5

कळवा सागरी सेतूचे काम अखेर सुरू

By admin | Updated: November 11, 2014 23:01 IST

कळवा खाडीवर उभारण्यात येणा:या सागरी सेतूचा मार्ग अडीच वर्षाच्या तपानंतर आता मोकळा झाला आहे. अडथळ्यांची शर्यत पार करून अखेर या पुलाच्या कामाला मुहूर्त सापडला.

अजित मांडके ल्ल ठाणो
कळवा खाडीवर उभारण्यात येणा:या सागरी सेतूचा मार्ग अडीच वर्षाच्या तपानंतर आता मोकळा झाला आहे. अडथळ्यांची शर्यत पार करून अखेर या पुलाच्या कामाला मुहूर्त सापडला.  येत्या दोन वर्षात हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असा दावा पालिकेने केला आहे. यामुळे ठाण्याकडून खारेगांव आणि विटाव्याकडे जाणा:या वाहनचालकांचा मार्ग सुकर होणार आहे.
मुंबईत सी लिंक या सागरी सेतुच्या धर्तीवर  ठाणो महापालिकेने देखील विटावा पुलाखालील आणि एकूणच या भागातील वाहतूककोंडी सुटावी यासाठी या सेतूचा प्रस्ताव जानेवारी 2क्12 मध्ये पुढे आणला होता. सध्या येथील कळवा खाडीवर एक ब्रिटीश कालीन आणि आणखी एक पूल आहे. परंतु, ब्रिटीश कालीन पूल कमकुवत झाल्याने त्यावरील वाहतूक दुस:या पुलावर वळविण्यात आली आहे. परंतु, दुसरा पूलही वाहतुकीसाठी कमी पडू लागल्याने पालिकेने तिस:या पुलाचा पर्याय पुढे आणला. यासाठी 2क्11 च्या आर्थिक वर्षात 1क् कोटींची तरतूद केली होती. त्यानंतर आता या सागरी सेतुसाठी सुमारे 183 कोटींचा खर्च केला जाणार असल्याची माहिती पालिका सूत्रंनी दिली.  
जुन्या दोन पुलांच्या बाजूलाच मात्र त्यांच्यापेक्षा थोडय़ा उंचीवर हा सागरी सेतू उभारण्यात येणार आहे. ठाण्याकडून खारेगांव (मनिषा नगर) आणि विटाव्याच्या पुढे म्हणजेच ठाणो - बेलापूर दिशेला असा दोनही मार्गाने हा पूल खाली उतरणार आहे. 
कळव्याकडून ठाण्याकडे येतांना हा सेतू साकेत, जेल तलाव आणि कोर्टनाका मार्गे ठाणो स्टेशनकडे खाली उतरणार आहे. आता त्यात थोडा बदल करण्यात आला असून आत्माराम चौक र्पयतचा रस्ता या पुलाला जोडण्याचा विचार पालिकेने केला आहे. केबल स्टेड टाईपचा असलेला हा सेतू सुमारे दीड किमीचा असणार आहे. या सेतुमुळे विटाव्या पुलाखालील आणि कळवा नाक्यावर होणारी वाहतूककोंडी फुटणार आहे. ठाण्याच्या दिशेने हा सेतू खाली उतरत असल्याने या ठिकाणी असलेल्या सर्कलजवळ होणा:या वाहतूककोंडीतूनही वाहनचालकांची सुटका होणार आहे. 2क्12 मध्ये या संदर्भातील प्रस्ताव महासभेत मंजूर केला होता.