Join us

महागाईला अच्छे दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 02:35 IST

मोदी सरकारच्या कारकिर्दीतील पेट्रोल दराचा उच्चांक रविवारी गाठला गेला.

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या गेल्या वर्षीच्या जूनपासून पेट्रोल, डिझेलच्या किमतीत दररोज बदल करत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव सतत चढे असून, त्यामुळे देशातील सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी शनिवारपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात अनुक्रमे प्रति लीटर १३ व १५ पैसे दरवाढ केली आहे. मात्र, दिल्लीमध्ये रविवारी पेट्रोल व डिझेलच्या दरात प्रत्यक्षात प्रति लीटर १९ पैशांनी वाढ झाली आहे. १४ सप्टेंबर २०१३ रोजी पेट्रोल दर प्रति लीटर ७६ रुपये ६ पैसे इतका झाला होता. त्यानंतर, मोदी सरकारच्या कारकिर्दीतील पेट्रोल दराचा उच्चांक रविवारी गाठला गेला.आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल व डिझेलचे दर सतत चढे असून, ते सामान्यांच्या आवाक्यात राहाण्यासाठी अबकारी करातकपात करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने दिला होता, पण अर्थमंत्री अरुण जेटली यांनी १ फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात या संदर्भात कोणतीही सवलतजाहीर करण्यात आली नाही.आंतरराष्ट्रीय स्तरावर किमती कमी झाल्याने, अरुण जेटली यांनी नोव्हेंबर २०१४ ते जानेवारी २०१६ या कालावधीत पेट्रोल, डिझेलवरील अबकारी करात नऊ वेळा वाढ केली. मात्र, गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात केंद्राने पेट्रोल व डिझेलवरील अबकारी करात प्रति लीटर दोन रुपये कपात केली होती.इंधन दरांचा नवा उच्चांक!नवी दिल्ली/मुंबई : मोदी सरकारच्या कारकिर्दीतील पेट्रोल दराचा उच्चांक रविवारी गाठला गेला. मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लीटर ८२ रुपये २५ पैसे झाले आहेत. डिझेलचे दरही कडाडले असून, ते प्रति लीटर ६९ रुपये ९१ पैसे झाले आहेत.मोदी सरकारच्या कारकिर्दीतील सर्वाधिक किमती मुंबईत पेट्रोल ८२.२५ तर डिझेल ६९.९१ रुपयांवर 

टॅग्स :पेट्रोल