Join us
Daily Top 2Weekly Top 5

महिला डब्यातील घुसखोरी पडली महागात

By admin | Updated: June 3, 2015 04:14 IST

मध्य रेल्वेकडून २६ मे पासून प्रवासी उपभोक्ता पंधरवडा साजरा केला जात असून त्यानिमित्ताने रेल्वेचे नियम मोडणाऱ्यांविरोधात विशेष मोहिमेद्वारे कठोर

मुंबई : मध्य रेल्वेकडून २६ मे पासून प्रवासी उपभोक्ता पंधरवडा साजरा केला जात असून त्यानिमित्ताने रेल्वेचे नियम मोडणाऱ्यांविरोधात विशेष मोहिमेद्वारे कठोर कारवाई केली जात आहे. यात महिला प्रवाशांच्या डब्यात घुसखोरी करणाऱ्या पुरुष प्रवाशांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत ४९८ पुरुष प्रवासी रेल्वे पोलीस आणि टीसींच्या जाळ्यात अडकल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. २६ मे ते ९ जूनपर्यंत रेल्वे प्रवासी उपभोक्ता पंधरवडा रेल्वेकडून साजरा केला जात आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून पंधरवडा साजरा केला जातानाच त्यानिमित्ताने प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. या पंधरवड्यादरम्यान सुरक्षा, स्वच्छता आणि सोयी-सुविधांवर भर देण्यात येत आहे. प्रवासी उपभोक्ता पंधरवड्याचे निमित्त साधून रेल्वेने नियम मोडणाऱ्यांविरोधात विशेष मोहिमेद्वारे कठोर कारवाईही करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला प्रवाशांच्या डब्यात घुसखोरी करणाऱ्या ४९८ पुरुष प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. यात रेल्वे पोलिसांनी १५८ तर टीसींनी ३४0 जणांना पकडल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.