Join us

इंद्राणीला डेंग्यू नाही

By admin | Updated: October 30, 2015 01:03 IST

शीना बोरा हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीला वैद्यकीय तपासणीच्या अहवालात डेंग्यूची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले.

मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीला वैद्यकीय तपासणीच्या अहवालात डेंग्यूची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले. गुरुवारी सायंकाळी जे.जे. रुग्णालयातून तिला डिस्चार्ज देण्यात आला असून, तिची रवानगी भायखळ्यातील महिला कारागृहात करण्यात आली. इंद्राणीला ताप आल्याने प्लेटलेट्स कमी झाल्याचे आढळले होते. त्याबाबत आवश्यक औषधे दिल्यानंतर त्यामध्ये वाढ झाली. आता इंद्राणीची प्रकृती सुधारल्यामुळे तिला डिस्चार्ज दिल्याचे जे. जे. चे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. (प्रतिनिधी)