Join us

फ्लॅटमध्ये कोणीही गेलेले इंद्राणीला आवडत नव्हते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 06:00 IST

अपार्टमेंट कर्मचाऱ्याची विशेष न्यायालयात साक्ष

मुंबई : शीना बोराच्या हत्येनंतर कोणालाही विशेषत: राहुल मुखर्जीला आपल्या फ्लॅटमध्ये जाऊ देऊ नये, अशी ताकीद इंद्राणी मुखर्जीने दिल्याची साक्ष इंद्राणी राहत असलेल्या हाउसिंग सोसायटीच्या व्यवस्थापकाने विशेष न्यायालयाला शुक्रवारी दिली.

वरळी येथील मार्लो को-आॅप. हा. सोसायटीचे व्यवस्थापक एम. किलजे यांनी विशेष सीबीआय न्यायालयात शुक्रवारी साक्ष नोंदविली.सीबीआयच्या म्हणण्यानुसार, राहुल मुखर्जी आणि शीना बोरा यांच्या प्रेमाला इंद्राणीचा विरोध होता. राहुल हा पीटर मुखर्जीला पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा आहे. तर शीना ही इंद्राणीला दुसºया पतीपासून झालेली मुलगी आहे.

‘२३ एप्रिल २०१२ रोजी मी सोसायटीच्या कार्यालयात जात असताना मला इंद्राणी मुखर्जी भेटली. तिने मला पुढील दोन ते तीन दिवस कोणालाही विशेषत: राहुल मुखर्जीला तिच्या फ्लॅटमध्ये जाऊ न देण्याची ताकीद दिली,’ अशी साक्ष किलजी यांनी न्यायालयात दिली.शीनाची (२४) हत्या तिची आई इंद्राणीने केल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. २४ एप्रिल २०१२ रोजी इंद्राणीने अन्य सहकाºयांच्या मदतीने शीनाची कारमध्ये हत्या केली. रायगडच्या जंगलात तिच्या शवाची विल्हेवाट लावेपर्यंत ते शव इंद्राणीच्या फ्लॅटमध्ये ठेवण्यात आले होते, असा दावा सीबीआयने केला आहे.

राहुल मुखर्जी २५ व २६ एप्रिल रोजी इंद्राणीच्या सोसायटीत आला. मात्र, इंद्राणीच्या सूचनेनुसार त्याला फ्लॅटमध्ये जाऊ दिले नाही, असेही किलजी यांनी न्यायालयाला सांगितले. इंद्राणीचा ड्रायव्हर श्यामवर राय याला अन्य एका केसमध्ये आॅगस्ट २०१५ मध्ये अटक केल्यानंतर शीना बोराच्या हत्येचे प्रकरण समोर आले.आर्थिक वादातून हत्या; सीबीआयचा दावाइंद्राणीचा ड्रायव्हर श्यामवर राय याला अन्य एका केसमध्ये आॅगस्ट २०१५ मध्ये अटक केल्यानंतर शीना बोराच्या हत्येचे प्रकरण समोर आले. त्यानंतर पोलिसांनी इंद्राणी, तिचा आधीचा पती संजीव खन्ना, पीटर मुखर्जीला अटक केली. आर्थिक वादावरून शीनाची हत्या केल्याचा सीबीआयचा दावा आहे.

टॅग्स :इंद्राणी मुखर्जी