Join us

परस्पर आत्मीयतेमुळेच भारत-अमेरिका संबंध दृढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 04:39 IST

अमेरिकेचे ८वे राष्ट्रध्यक्ष मार्टीन वॅन बुरेन यांनी १८३८साली फिलेमॉन पारकर यांना मुंबईत पहिले काउन्सूल म्हणून पाठविले होते.

मुंबई : अमेरिकेचे ८वे राष्ट्रध्यक्ष मार्टीन वॅन बुरेन यांनी १८३८साली फिलेमॉन पारकर यांना मुंबईत पहिले काउन्सूल म्हणून पाठविले होते. तेव्हापासून भारत- अमेरिकेचे राजनैतिक संबंध आहेत. या दोन्ही देशांतील नागरिकांना एकमेकांबद्दल असलेली आत्मीयता आणि त्यांचे एकमेकांशी असलेले बंध, यामुळे हे संबंध अधिकाधिक दृढ होत आहेत. राजकीय आणि आर्थिक आघाड्यांवर त्यात चढ-उतार आले, तरीही उभय देशांतील नागरिकांच्या रेट्यामुळे हे संबंध सौहार्दपूर्णच राहतात, असे निरीक्षण अमेरिकेचे मुंबईतील काउन्सूल जनरल अ‍ॅडगर्ड कॅगन यांनी येथे नोंदविले.अमेरिकेच्या २४२च्या राष्टÑीय दिनानिमित्त दक्षिण मुंबईत नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्योग, व्यवसायाच्या माध्यमातून वृद्धिंगत होत असलेल्या उभय देशांतील संबंधांची देसाई यांनी वाखाणणी केली.तसेच राष्टÑीय दिनानिमित्त राज्य शासनाच्या वतीने अमेरिकेला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी अमेरिकी मरीन जवानांनी केलेले संचलन विशेष लक्षवेधी ठरले.