Join us  

बेने इस्रायली समुदायाच्या माध्यमातून भारत- इस्रायल संबंध वृद्धींगत होतील

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 11:43 PM

बेने इस्रायली समुदाय भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये सांस्कृतिक दुव्याचे काम करु शकतो असा विश्वास इंडियन कौन्सील फॉर कल्चरल रिलेशनचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केला. मुंबईत भरलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय बेने इस्रायली संनेलनात ते बोलत होते. जगभरातील विविध देशांतील बेने इस्रायली लोकांनी या संमेलनास हजेरी लावली होती.

मुंबई- बेने इस्रायली समुदाय भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये सांस्कृतिक दुव्याचे काम करु शकतो असा विश्वास इंडियन कौन्सील फॉर कल्चरल रिलेशनचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केला. मुंबईत भरलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय बेने इस्रायली संनेलनात ते बोलत होते. जगभरातील विविध देशांतील बेने इस्रायली लोकांनी या संमेलनास हजेरी लावली होती.डॉ. विनय सहस्रबुद्धे पुढे म्हणाले, एखादा देश समजून घेणे म्हणजे केवळ नकाशा समजून घेणं नाही कर तेथील लोकांना समजून घेणं, त्यांच्या संस्कृतीची माहिती करुन घेणं होय. भारत आणि इस्रायल यांचे सांस्कृतीक संबंध अधिक दृढ करण्यासाठी बेने इस्रायली मदत करु शकतात. इस्रायली लोकांची उद्यमशिलता भारतीय तरुणांना समजावून देण्यासाठी ते प्रयत्न करु शकतात. बेने इस्रायली लोकांची चिकाटी, परिश्रमी वृत्तीचा आम्हाला अभिमान आहे अशा शब्दांमध्ये त्यांनी बेने इस्रायली समुदायाचे कौतुकही केले. १९७८ साली भारताचे परराष्ट्रमंत्री असताना अटलबिहारी वाजपेयी यांनी भारत इस्रायल संबंधांचा पाया स्थिर केला आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा हे संबंध पुढे नेत आहेत, असेही सहस्रबुद्धे यांनी सांगितले.बेने इस्रायली महाराष्ट्राशी पूर्णतः एकरुप झाले. मराठी भाषा त्यांनी स्वीकारली, संस्कृतीला स्वीकारले. इस्रायलमध्ये गेल्यावरही त्यांनी संस्कृती जपलीही विशेष बाब आहे. इस्रायलने शेती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात केलेल्या विकासाचा महाराष्ट्राला भरपूर फायदा होऊ शकतो असे प्रतिपादन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.यावेळेस आ. जयंत पाटील, विजू पेणकर, जॉन पेरी, जोनाथन सोलोमन, इस्रायलचे मुंबईतील उपवाणिज्यदूत निम्रूद उपस्थित होते. इस्रायली कलाकारांनी सांस्कृतीक कार्यक्रमही सादर केले.

टॅग्स :मुंबई