Join us

मोखाड्यात इंदिरा घरकुले रखडलीत

By admin | Updated: November 21, 2014 22:51 IST

दुर्बल घटकातील उपेक्षीत बांधवांची निवाऱ्याची गरज पूर्ण व्हावी यासाठी शासनाने मोठा गाजावाजा करत इंदिरा आवास घरकुल योजना सुरू केली.

मोखाडा ग्रामीण : दुर्बल घटकातील उपेक्षीत बांधवांची निवाऱ्याची गरज पूर्ण व्हावी यासाठी शासनाने मोठा गाजावाजा करत इंदिरा आवास घरकुल योजना सुरू केली. परंतु स्थानिक प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे या योजनेचा मोखाडा तालुक्यात पूर्णपणे बोजवारा उडाला आहे.यातील काही लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयाला घेराव घातला होता यावेळी तहसीलदार परवेज पिरजादा यांनी समजूत घालून ८ ते ९ दिवसात लाभार्थ्यांना तिसरा हप्ता मिळेल असे गटविकास अधिकारी प्रमोद गोडाबे यांनी सांगितले होते. परंतु अजूनपर्यंत आदिवासी बांधव प्रतीक्षेत असून ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांच्या दुर्लक्षीत कारभारामुळे प्रतिक्षा करावी लागत असल्याचा आरोप आदिवासींकडून केली जात आहे.तसेच दुसऱ्या हप्त्याच्या रकमेच्या वापराचे मूल्यांकन झाले नसल्यामुळे तिसरा हप्ता रखडला असल्याचे संबंधीत यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे घरांची फोटो पाहणी सुद्धा अनेकदा करण्यात आली असल्याचे लाभार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे. यावरून प्रशासनच हलगर्जीपणा करत असल्याचे एकंदरीत परिस्थितीवरून दिसून येत आहे. तसेच हि परिस्थिती इतरही ग्रामपंचायतीमध्ये असून दोषींच्या चौकशीची मागणी केली जात आहे. (वार्ताहर)