Join us  

सीबीआयकडून इंद्राणी व पीटर मुखर्जी यांची स्वतंत्र चौकशी, तीन तास कसून विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2017 8:09 PM

शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी व तिचा पती पीटर मुखर्जी यांची सीबीआयच्या अधिका-यांनी स्वतंत्रपणे कसून चौकशी केली.

मुंबई : शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी व तिचा पती पीटर मुखर्जी यांची सीबीआयच्या अधिका-यांनी स्वतंत्रपणे कसून चौकशी केली. सुमारे तीन तास चाललेल्या चौकशीत त्यांच्याकडून आयएनएक्स मिडीया कंपनीची मलेशियात असलेल्या परदेशी गुंतवणूक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी विचारणा करण्यात आली. शुक्रवारी पुन्हा त्याची चौकशी केली जाणार असल्याचे अधिका-यांकडून सांगण्यात आले. इंद्राणी भायखळा तर पीटर हा आॅर्थर रोड जेलमध्ये आहे.

देशभरात चर्चेचा विषय बनलेल्या शीना बोरा हत्याकांड प्रकरणी त्याची आई इंद्राणी व सावत्र पिता पीटर मुखर्जी सुमारे दोन वर्षापासून कोठडीतआहेत.सीबीआयने त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. पीटर मुखर्जी याने आयएनएक्स या कंपनीची स्थापना केली होती, तर इंद्राणी तिची मुख्य कार्यकारी अधिकारी होती. या कंपनीचे कोट्यावधीचे शेअर्स अमेरिका, इंग्लड ,मलेशिया आदी देशात गुंतवल्याचे तपासातून पुढे आले आहे. त्यामध्ये परदेशी गुंतवणूकीबाबतच्या ‘एफईपीबी’चे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले आहे. त्याबाबत त्यांच्याकडे चौकशी करण्यासाठी सीबीआयने न्यायालयात मागणी केली होती. कोर्टाने दिलेल्या मंजुरी दिल्याने सीबीआयच्या एका पथकाने आॅर्थर रोड जेलमध्ये तर दुसºया पथकाने भायखळ्यात जाऊन त्यांच्याकडे चौकशी केली. कंपनीमधील अन्य भागीदार, गुंतवणूकीबाबत माहिती घेण्यात आली असून शुक्रवारीही त्यांच्याकडे चौकशी करण्यात येणार असल्याचे अधिका-यांने सांगितले.

 

टॅग्स :शीना बोरा हत्या प्रकरण