Join us

भारताच्या सोन्याच्या मागणीत तब्बल 39 टक्क्यांची घसघशीत वाढ

By admin | Updated: November 13, 2014 23:36 IST

देशात सोन्याची मागणी जुलै-सप्टेंबर या तिमाहीत 39 टक्क्यांनी वाढून 225.1 टनावर पोहोचली आहे.

मुंबई : देशात सोन्याची मागणी जुलै-सप्टेंबर या तिमाहीत 39 टक्क्यांनी वाढून 225.1 टनावर पोहोचली आहे. जागतिक सुवर्ण परिषद अर्थात डब्ल्यूजीसीच्या अहवालात आभूषणांची विक्री वाढल्याने देशात सोन्याची मागणी वधारल्याचे नमूद केले आहे.
2क्13 च्या तिस:या तिमाहीत देशात 16.1 टन सोन्याची मागणी झाली होती. अहवालानुसार, सप्टेंबरच्या तिमाहीत मूल्याच्या हिशेबाने सोन्याची मागणी 31 टक्क्यांनी वाढून 56,219.3 कोटी रुपयांवर पोहोचली. गेल्यावर्षी याच तिमाहीत ही मागणी 42,829.6 कोटी रुपये होती. एकूण आभूषणांची मागणी 6क् टक्क्यांनी वाढून 182.9 टनावर पोहोचली. 2क्13 च्या तिस:या तिमाहीत ही 114.5 टन होती.
मूल्याच्या दृष्टीने जुलै-सप्टेंबर तिमाहीत आभूषणांची मागणी 51 टक्क्यांनी वधारून 45,681.6 कोटी रुपयांवर पोहोचली. गेल्यावर्षी याच तिमाहीत ही मागणी 3क्,346.5 कोटी रुपये एवढी होती.
परिषदेचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम पी. आर. यांनी सांगितले की, ‘2क्14 च्या तिस:या तिमाहीत सोन्याच्या आभूषणांची मागणी गेल्यावर्षीच्या तिमाहीतील कमजोर आकडेवारीच्या तुलनेत वधारली. त्यावेळी अनेक प्रकारचे शुल्क व नियंत्रण यामुळे सोन्याच्या मागणीवर नकारात्मक परिणाम झाला होता.’ तिस:या तिमाहीला सोन्याच्या मागणीच्या दृष्टीने सामान्यरीत्या पाहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.
या तिमाहीदरम्यान, शुल्क कपात व धोरणात लवचिकता आणण्याबाबतची अपेक्षापूर्ती होऊ शकली नाही. दिवाळीच्या काळात सोन्याच्या मागणीवरून देशातील आशावादी कल दिसून येतो, असे मत सोमसुंदरम यांनी व्यक्त केले. आयातीवर नियंत्रण असल्याने सोन्याच्या मागणीवर किरकोळ प्रभाव पडला. मात्र, यावरील चर्चा व्यर्थ असल्याचे त्यांनी सांगितले. 
दुसरीकडे भारतात मात्र, आभूषणांची मागणी वार्षिक आधारावर 6क् टक्क्यांनी वधारून या तिमाहीत 183 टन राहिली. आर्थिक परिस्थितीत सुधारणोच्या पाश्र्वभूमीवर अमेरिका व ब्रिटनमध्ये आभूषणांची मागणी तेजीत राहिली. अमेरिकेत आभूषणांची मागणी चार टक्क्यांनी वाढली तर चीनमध्ये यात 39 टक्के घट नोंदली गेली आहे. (प्रतिनिधी)
 
2 टक्क्यांनी घटली जागतिक मागणी
4यंदाच्या तिस:या तिमाहीत सोन्याच्या जागतिक मागणीत दोन टक्क्यांनी घट होऊन ती 929 टन राहिली.
4आभूषणांची मागणी कमी झाल्याने ही घट नोंदली गेली आहे, असे बाजाराशी संबंधित सूत्रंनी सांगितले.
 
4जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालानुसार, गेल्यावर्षी याच तिमाहीत 952.8 टन सोन्याची मागणी झाली होती.
4 यंदा जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत आभूषणांची एकूण मागणी चार टक्क्यांनी घटून 534 टन
राहिली. 
4गेल्यावर्षी या तिमाहीत ही मागणी 556.3 टन होती.