Join us

पर्यटनासाठी भारतीयांची पसंती कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनीला, मुंबईतून व्हिसा अर्जांत ३० टक्के वाढ

By मनोज गडनीस | Updated: March 13, 2024 18:27 IST

कंपनीच्या पश्चिम विभागाचे मुख्याधिकारी शरद गोवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये मुंबईतून विविध देशांसाठी व्हीसा अर्जांमध्ये तब्बल ३० टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे.

मुंबई - सरत्या वर्षात भारतीयांना परदेशात जाण्यासाठी प्रामुख्याने कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, नेदरलँडस्, सौदी अरेबिया, स्वित्झर्लंड, युके, अमेरिका आदी देशांना मोठ्या प्रमाणावर पसंती दिल्याची माहिती व्हीएफएल ग्लोबल या व्हीसा क्षेत्रात कार्यरत कंपनीने दिली आहे. कंपनीतर्फे विविध देशांसाठी व्हीसा देण्यासाठी काम केले जाते.

कंपनीच्या पश्चिम विभागाचे मुख्याधिकारी शरद गोवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये मुंबईतून विविध देशांसाठी व्हीसा अर्जांमध्ये तब्बल ३० टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. तर कोरोना पूर्व काळाच्या तुलनेत भारतीयांचे परदेशात जाण्याचे प्रमाण देखील वाढीस लागले असून त्या कालावधीच्या तुलनेत ९० टक्क्यांपर्यंत पुन्हा एकदा लोक परदेशात जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारतीयांचा परदेशी प्रवासाचा ट्रेन्ड २०२४ या वर्षात देखील अशाच पद्धतीने वाढताना दिसेल, असा अंदाज देखील त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :मुंबई