मुंबई : गेल्यावर्षभरापासून सातत्याने सुरू असलेल्या तेजीमुळे कंपन्यांच्या बाजारमूल्यात झालेली वाढ, उलाढाल आणि गुंतवणूकदारांना मिळालेला परतावा यामुळे भारतीय शेअर बाजाराने जागतिक शेअर बाजारांच्या यादीत दुसरा क्रमांक पटकाविल्याची माहिती एका सव्रेक्षणाद्वारे पुढे आली आहे.
या सव्रेक्षणानुसार, अमेरिकी शेअर बाजाराने आपला वरचष्मा कायम राखला असून चीनला मागे टाकत भारताने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. डिसेंबर 2क्13 ते ऑगस्ट 2क्14 या कालावधीमध्ये भारतीय शेअर बाजारात तब्बल 15 खर्व 9क् कोटी अमेरिकी डॉलर इतकी गुंतवणूक झाली. डिसेंबर 2क्13 ते ऑगस्ट 2क्14 या कालावधीत जागतिक शेअर बाजारात एकूण 66 खर्व अमेरिकी डॉलर इतकी गुंतवणूक झाली. यापैकी एकरकमी 15 खर्व अमेरिकी डॉलर इतकी गुंतवणूक भारतीय शेअर बाजारात झाल्याने भारतीय शेअर बाजाराची मोहिनी जगभरातील गुंतवणूकदारांवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या महाकाय गुंतवणुकीमुळे भारतीय शेअर बाजारातील दीर्घ भागभांडवल, मध्यम श्रेणी व लघु श्रेणीत अशा विविध श्रेणीतील कंपन्यांच्या बाजारमूल्यात 1क्. 29 टक्के इतकी वाढ झाली. जागतिक शेअर बाजारात विविध शेअर बाजारांत झालेल्या व्यवहारांमुळे तेथील बाजारमूल्यात झालेल्या वाढीचा विचार करता साडे पाच टक्के इतकी एकटी वाढ भारतीय शेअर बाजारात झाली आहे. (प्रतिनिधी)
च्शेअर बाजाराची जी जागतिक क्रमवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे, त्यानुसार अमेरिका आणि भारताने अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक पटकावितानाच तिस:या क्रमांकावर चीन, चौथ्या क्रमांकावर ब्राझील, पाचव्या क्रमांकावर दक्षिण कोरिया, सहाव्या क्रमांकावर तैवान, तर सातव्या क्रमांकावर इंडोनेशिया, आठव्या क्रमांकावर जपान, नवव्या क्रमांकावर ब्रिटन आणि दहाव्या क्रमांकावर रशिया असे स्थान विविध देशांनी पटकाविले आहे.
च्या सर्वातील समान धागा म्हणजे, जागतिक मंदी उठल्यानंतर या सर्वच प्रमुख शेअर बाजारांतून तेजी परतल्याचे चित्र आहे.
च्मंदीचा ब:यापैकी फटका भारतीय शेअर बाजारांना बसल्याने आणि येथील अनेक महाकाय कंपन्यांचे समभाग आकर्षक किमतीला उपलब्ध असल्याने व त्यावरील परताव्याचे प्रमाणही उत्तम असल्याने परदेशी वित्तीय संस्थांचा मोठा ओढा भारतीय शेअर बाजाराकडे असल्याचे दिसून आले आहे.