Join us

भारतीय अ‍ॅथलिट्सना सलमान खान देणार प्रत्येकी 1 लाख 1 हजार रुपयांचा चेक

By admin | Updated: August 17, 2016 19:50 IST

सलमान खाननं रिओ ऑलिम्पिकमधल्या भारतीय अ‍ॅथलिट्सना प्रत्येकी 1 लाख 1 हजार रुपयांचा चेक देण्याचं जाहीर केलं

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 17 - सलमान खान नेहमीच स्वतःच्या चित्रपट आणि वादग्रस्त वक्तव्यानं चर्चेत असतो. आता अभिनेता सलमान खाननं ऑलिम्पिकमधल्या भारतीय अ‍ॅथलिट्ससाठी नवी आनंदाची घोषणा केली आहे. सलमान खाननं रिओ ऑलिम्पिकमधल्या भारतीय अ‍ॅथलिट्सना प्रत्येकी 1 लाख 1 हजार रुपयांचा चेक देण्याचं जाहीर केलं आहे. इतकंच नव्हे तर तशा प्रकारचं ट्विट त्यानं ट्विटरच्या माध्यमातून शेअर केलं आहे.

सलमान खाननं भारत सरकारही ऑलिम्पिकमधल्या खेळाडूंना योग्य प्रोत्साहन देत असून, चांगल्या प्रकारे त्यांचा सन्मान करत असल्याचं टिवटरच्या माध्यमातून म्हटलं आहे. सलमानच्या या दातृत्वामुळे त्याच्या चाहत्यांना त्याचं हे नवं रूप पाहायला मिळालं आहे. सलमाननं ट्विट करून अनेक कंपन्यांना भारतीय ऑलिम्पिकपटूंना समर्थन देण्याचं आवाहनही केलं आहे.