Join us

अंतिम फेरीत भारत, न्यूझीलंड?

By admin | Updated: March 17, 2015 00:58 IST

कमजोर संघ, आऊट आॅफ फॉर्ममध्ये असलेले प्रमुख खेळाडू यामुळे टीम इंडिया वर्ल्डकपच्या क्वार्टर फायनलमध्येही मजल मारू शकत नाही, अशी चर्चा वर्ल्डकप सुरू होण्याआधी होती.

सट्टाबाजारात चर्चेला उधाण : क्वार्टर फायनलमध्ये भारत, आफ्रिका, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड फे व्हरेटजयेश शिरसाट - मुंबईकमजोर संघ, आऊट आॅफ फॉर्ममध्ये असलेले प्रमुख खेळाडू यामुळे टीम इंडिया वर्ल्डकपच्या क्वार्टर फायनलमध्येही मजल मारू शकत नाही, अशी चर्चा वर्ल्डकप सुरू होण्याआधी होती. मात्र हीच टीम इंडिया वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचेल, कदाचित वर्ल्डकपवर नावही कोरेल, असा अंदाज सटटाबाजारातून व्यक्त होत आहे. यंदाचा वर्ल्डकप टीम इंडिया किंवा न्यूझीलंड जिंकेल, अशी जोरदार चर्चा सटटाबाजारात आहे. १८ ते २१ मार्चदरम्यान उपांत्यपूर्वची बाद फेरी रंगेल. यातून विजयी चार संघ उपांत्य फेरीत झुंजतील. उपांत्यपूर्व लढतीत १९ मार्चला टीम इंडियासमोर बांग्लादेश झुंजणार आहे. या सामन्यात सटटाबाजारातल्या बड्या बुकींनी टीम इंडियावर फक्त १९ पैशांचा भाव खुला केला आहे. तर बांग्लादेशवर ५ रूपयांचा. उर्वरित तीन सामन्यांमध्ये सर्वात चुरशीचा सामना १८ मार्चला श्रीलंका-दक्षिण आफ्रिकेत रंगेल, असा अंदाज बुकी व्यक्त करतात. चोकर्स अशी ओळख असलेल्या आफ्रिका संघाला बुकींनी फेव्हरेट ठरविले आहे. बुकींनी आफ्रिकेवर ४५ पैसे तर श्रीलंकेवर २ रूपयांचा भाव खुला केला आहे. उर्वरित दोन सामन्यांमध्ये आॅस्ट्रेलियावर २७ पैसे, न्यूझीलंडवर ३६ पैसे असे भाव खुले करण्यात आले आहेत. या दोन्ही संघांविरोधात आव्हान उभे करणाऱ्या अनुक्रमे पाकिस्तानवर साडेतीन रूपये, वेस्ट इंडिजवर २.७५ पैसे या भावाने सटटा लागण्यास सुरूवात झाली आहे. सटटाबारात सुरू असलेल्या चर्चेनुसार टीम इंडियासह, आफ्रिका, न्यूझीलंड, आॅस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये धडकतील. साखळी सामने संपल्यानंतर विश्वकप कोण जिंकेल यावर बुकींनी नवे भाव खुले केले आहेत. त्यानुसार आॅस्ट्रेलिया, आफ्रिका सुपर फेव्हरेट आहेत. या दोन्हीसंघांवर अनुक्रमे १.९० आणि ४.३० रूपयांचा भाव खुला झाला आहे. न्यूझीलंड(४.६०) आणि टीम इंडिया (४.७०) तिसऱ्या व चौथ्या स्थानावर आहेत. श्रीलंकेवर १७ रूपये, पाकिस्तान २८ रूपये, वेस्ट इंडिज ३१ रूपये तर बांग्लादेशवर तब्बल २१९ रूपये असा भाव खुला करण्यात आला आहे. विश्वकपचे भाव उपांत्यपूर्व सामने झाल्यानंतर बदलतील, असे एका बुकीने सांगितले.