मुंबई : पॅरिस येथील ऑर्गनायजेशन फॉर इकॉनॉमिक को- ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (ओईसीडी) या संस्थेने भारताचा विकासदर 5.7 टक्के राहील, असे म्हटले आहे. आपला आधीचा 4.9 टक्के वृद्धीदराचा अंदाज बदलून सोमवारी या संस्थेने हा नवा अंदाज व्यक्त केला आहे. जागतिक पातळीवर अर्थव्यवस्थेला फारशी चालना मिळाली नाही, तरीही भारताचा हा विकासदर कायम राहील, असे या संस्थेने म्हटले आहे.
भारतातील विकासदरात वाढ होणो अपेक्षित आहे. ब्राझीलही मंदीतून हळूहळू बाहेर पडण्याच्या स्थितीत आहे. भारताचा 2क्14 मधील विकासदर हा 5.7 टक्के, तर 2क्15 मधील हा दर 5.9 टक्के असेल, असे ओईसीडीने म्हटले आहे.
संस्थेचा आर्थिक मूल्यांकन अहवाल प्रसिद्ध झाला असून, विकसित आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये विकासदराचा आलेख वरच्या दिशेने सरकू लागला असल्याचे त्यात म्हटले आहे.
युरोपीयन देशांची परिस्थिती अजूनही फारशी समाधानकारक नाही, असे स्पष्ट करतानाच मागणी वाढण्यासाठी वेळीच उपाय योजले नाहीत, तर स्थिती दीर्घकाळासाठी प्रतिकूल राहील, असा इशाराही या संस्थेने दिला आहे. (प्रतिनिधी)