मुंबई : बलात्कार झालेल्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून दिल्याप्रकरणी जोगेश्वरीतील चंगेज मुलतानी या अपक्ष नगरसेवकाला आंबोली पोलिसांनी गजाआड केले. बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील विविध कलमांनुसार मुलतानी यांच्यावर कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सहाय्यक पोलीस आयुक्त समाधान धनेदर यांनी दिलेल्या माहितीनुसार 2क्12मध्ये एका अल्पवयीन मुलीवर दोन तरूणांनी बलात्कार केला. त्यातून ही मुलगी गरोदर राहिली. याप्रकरणी बलात्कार करणा:या आरोपीसोबत या मुलीचा विवाह करण्यास तिच्या पालकांना मुलतानी यांनी भाग पाडले. विवाहानंतर आरोपी कामानिमित्ताने परदेशात पसार झाला. त्यानंतर पालकांनी न्याय मिळविण्यास उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने विशेष तपास पथक तयार करून या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश आंबोली पोलिसांना दिले होते. मुलतानी यांना न्यायालयाने पोलीस कोठडीत धाडले आहे.