मुंबई : देवदर्शनासाठी आलेल्या मुंबादेवी मतदारसंघातील अपक्ष उमेदवारावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना आज चेंबूर येथे घडली. याबाबत आरसीएफ पोलिसांनी चार अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.
मुंबादेवी परिसरातून अपक्ष निवडणूक लढवणा:या प्रिया राठोड यांनी काही दिवसांपूर्वी चेंबूरच्या माहूल येथे असणा:या दग्र्यामध्ये मन्नत मागितली होती. त्यानुसार त्या आज टॅक्सीने या परिसरात आल्या होत्या. देवदर्शन झाल्यानंतर पुन्हा टॅक्सीने घराकडे जात असताना दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान अचानक चार अनोळखी इसमांनी त्यांच्या टॅक्सीवर हल्ला केला. हल्लेखोरांनी टॅक्सीवर लोखंडी रॉड आणि काठीच्या साह्याने हल्ला करीत टॅक्सीची तोडफोड केली. तसेच त्यांना, त्यांच्यासोबत असलेल्या एका सहका:याला आणि टॅक्सी चालकाला मारहाण केली. (प्रतिनिधी)