Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्य दिनी वृक्षारोपण

By admin | Updated: August 14, 2015 22:54 IST

स्वातंत्र्य दिनी वृक्षारोपण

स्वातंत्र्य दिनी वृक्षारोपण
मुंबई : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत अर्थ फाऊंडेशनच्या वतीने एव्हरग्रीन इंडिया हा उपक्रम राबविण्यात येणार असून, या अंतर्गत महाराष्ट्रात वृक्षारोपण केले जाणार आहे. विकासाच्या नावाखाली निसर्गाची लुट सुरु असून, ती थांबविण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, असे संस्थेच्या रोहिणी डांगे यांनी सांगितले. या उपक्रमात शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समावून घेण्यात येणार आहे. विशेषत: मुंबईच्या वातावरणात कोणती झाडे लावण्यात यावीत, याची यादी संस्थेने तयार केली आहे. राज्यभरात पन्नास हजार झाडे लावण्यात येणार असून, उपक्रमाच्या प्रचार आणि प्रसारासाठी सोशल नेटवर्क साईटचा आधार घेण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकही या उपक्रमात सहभागी होणार आहेत.