Join us

स्वातंत्र्यदिनी विजेचा लपंडाव

By admin | Updated: August 16, 2014 00:18 IST

एकीकडे भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन साजरा होत असताना दुसरीकडे पनवेल परिसरात विजेचा लपंडाव सुरू होता.

पनवेल : एकीकडे भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन साजरा होत असताना दुसरीकडे पनवेल परिसरात विजेचा लपंडाव सुरू होता. किमान या दिवशी तरी महावितरणने खबरदारी घेणे आवश्यक होते. मात्र विजेच्या झटक्यांचे रडगाणे आजही सुरू होते. पनवेल विभागात मोठया प्रमाणात शहरी भाग येत असून येथील विजेची गळती कमी आहे. त्याचबरोबर वसूलही चांगला असल्याने महावितरणकडून सुरळीत वीजपुरवठा होणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून पनवेलकरांच्या नशिबी अखंडित वीजपुरवठा नाही. वेळेवर वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना अनियमित आणि खंडित वीजपुरवठा केला जात आहे. कधीही वीज गायब होत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे आज स्वातंत्र्यदिनी सुद्धा विजेचा लपंडाव सुरूच राहिल्याने पनवेलकरांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी तातडीची उपाययोजना करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.