Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयांचा आफ्रिकन देशांकडे वाढता ओढा; वर्षभरात ७ लाख ६५ हजार प्रवासी गेले

By मनोज गडनीस | Updated: August 21, 2023 19:19 IST

सध्या आठवड्याला मुंबई विमानतळावरून आफ्रिका खंडातील आठ देशांसाठी ५५ फेऱ्या होत आहेत

मुंबई - अमेरिका आणि युरोपप्रमाणेच आता आफ्रिकन देशात जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून सरत्या वर्षात तब्बल ७ लाख ६५ हजार प्रवाशी आफ्रिकेतील विविध देशात गेले आहेत. मुंबई विमानतळ प्रशासनाने या संदर्भात आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

आफ्रिका खंडातील दक्षिण आफ्रिका, इजिप्त, केनिया, टांझानिया, नायजेरिया, झाम्बिया, कांगो, सुदान, युगांडा, इथियोपिया आदी देशांना भारतीयांना पसंती दिल्याचे दिसून येत आहे. तर, प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता आफ्रिका खंडात विमान सेवा देणाऱ्या विमान कंपन्यांनी आपल्या विमान फेऱ्यांमध्ये देखील लक्षणीय वाढ केली आहे. सध्या आठवड्याला मुंबई विमानतळावरून आफ्रिका खंडातील आठ देशांसाठी ५५ फेऱ्या होत आहेत. व्यवसाय आणि पर्यटन या दोन कारणांसाठी प्रामुख्याने लोक आफ्रिका खंडातील देशांकडे आकृष्ट होत असल्याचे या अहवालात नमूद आहे.