पारोळ : ग्रामीण वसईपुर्व परिसरात विविध प्रकारचे आमिष दाखवून फसविण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. नुकताच मांडवी व शिरसाड गावातील दोन नागरीकांना लाखो रू. च्या सोन्याच्या दागिन्यांचा गंडा घातला आहे.काही महिन्यापुर्वी या भागात दुकानफोडी व घरफोडीचे प्रमाण वाढले असताना नागरीकांच्या आंदोलनामुळे पोलीसांनी या भागात गस्त वाढवल्याने घरफोडी किंवा दुकान फोडी शक्य नसल्यामुळे चोरांनी आता वेगवेगळ्या शक्कल लढवून चोरी करण्यास सुरूवात केली आहे. मांडवी येथील घटनेत अजय किरकिरा यास मी डिश अँटीना कंपनीकडून आलो असून तुमची डीश नादुरूस्त आहे. पण या डिशला सोने लावले असता ती पुन्हा चालु होईल असे सांगितल्यावर घरातील महिलेने दागिने काढून दिले. व डीस दुरूस्त करण्याच्या बहाण्याने त्याने दागिने घेउन पलायन केले. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दुचाकी आली असता तुम्ही पॅन कार्ड आणले आहे का तर तुम्ही इथे थांबा मी घेऊन येतो असे सांगत तो पुन्हा महिलेच्या घरी जाऊन तुझ्या आईने घरातील सर्व दागिने मागितले आहेत असे सांगितले. त्या मुलीने घरातील तीन तोळे दागिने आपल्या भावाबरोबर देत या इसमाबरोबर पाठवले. पुढे गेल्यानंतर त्यांना त्या मुलास आधारकार्ड घेऊन ये मी ये दागिने सांभाळतो असे सांगत मुलगा घरी गेला. त्यावेळी दागिने घेऊन पोबारा केला. या घटनांची नोंद मांडवी पोलीस चौकीत झाली. यावर महिलांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीसांनी केले आहे.
फसवणूकीच्या प्रकारात वाढ
By admin | Updated: September 29, 2014 03:02 IST